politics

बारामतीत १४ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसची अभूतपूर्व जाहीर सभा – सुनिल तटकरे

Share

मुंबई दि. ८ जुलै :

आजच्या बैठकीत दिनांक १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता बारामती येथे अभूतपूर्व अशी जाहीर सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बैठकीनंतर माध्यमांना दिली.

या जाहीर सभेत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना,तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना, शेतकऱ्यांच्या वीज माफीची योजना, तरुण – तरुणींना दहा हजार रुपये स्टायपेंड देण्याची योजना, सोयाबीन व कापूस उत्पादकांना पाच हजार रुपये देण्याचा निर्णय असेल, ई-पिंक रिक्षा, अशा ज्या वेगवेगळ्या योजना सरकारने जाहीर केल्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मार्फत जनतेपर्यंत पोचवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

मागील आठवड्यात पक्षाच्या विविध सेल, जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी यांची दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेतल्या. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरे जाण्यासंदर्भात जनतेचे मत काय आहे हे जाणून घेतले. महायुती सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मांडला. या अर्थसंकल्पाचे मोठया प्रमाणात स्वागत करण्यात आल्याचेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. याची जाणीव मनात ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता काम करणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

उद्या सकाळी ९ वाजता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वजण अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयात एकत्र जमणार आहोत हेही आवर्जून सुनिल तटकरे यांनी सांगितले.

आज राष्ट्रवादी काँग्रेसची अत्यंत महत्वाची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यासह सर्व मंत्री, आमदार, प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली.

Related posts

हरियाणातील अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर भाजप सरकार अल्पमतात

editor

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होणार : मोदी सरकार मुस्लिमविरोधी नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

editor

Union Minister Jyotiraditya Scindia’s Mother Passes Away at AIIMS, Delhi

editor

Leave a Comment