Civics

जोरदार पावसामुळे नद्यांना पुर ; आमदार फुंडकर यांनी दिल्या प्रशासनाला सूचना

Share

बुलढाणा प्रतिनिधि, ८ जुलाई :

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात रिमझिम पाऊस पडला, तर रात्री जोरदार पावसाला सुरवात झाली . त्यामूळे जिल्यातील अनेक नदी , नाले मोठया प्रमाणात भरून वाहू लागले आहे.तर खामगांव तालुक्यात अनेक गावांना पुराचा वेढा पडला।

गारडगांव येथे बाप लेक अडकल्याचे समजताच आमदार आकाश फुंडकर यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना सूचना दिल्या त्यानुसार तलाठी व स्थानिक यांनी आधी जेसीबी ने काढण्याचा प्रयत्न केला.नंतर मोठी पोकलेंड मशीन पाठवण्याची तयारी सुरू असताना, तलाठी व स्थानिकांनी दोराच्या साहाय्याने त्या बाप लेकांना पुरातून सोडविण्यात यश आले.

पिंपरी गवळी या गावाजवळील आवरचे धरण सांडवा पूर्ण क्षमतेने वाहत होता,तसेच गावात पाणी घुसल्याची महिती गावकऱ्यांनी आमदार आकाश फुंडकर यांना दिली त्याबाबत तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून वेळ पडल्यास गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाला तयारीत राहण्यास सांगितले. तसेच आवर धरणाची पाणी पातळीवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले.

सध्या पिंपरी गवळी गावातील पुराचे पाणी ओसरले असून अंत्रज , नागपूर, हिवरखेड, व ज्ञानगंगा नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी केले . सोबतच महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने अलर्ट मोडवर रहावे , कोणतीही जीवित हानी होता कमा नये अशा सूचना दिल्या. झालेल्या जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्वरित पंचनामे करून तात्काळ त्यांचे अहवाल सादर करावे असे सूचनाही सुद्धा प्रशासनाला दिल्या आहे.

Related posts

खालापूर तालुक्यातील चौक येथील पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाजवळील रस्त्याची दयनीय अवस्था

editor

मुंबई मनपाच्या ढिम्म कारभारामुळे महिला गंभीर जखमी

editor

हरितक्रांतीचे जनक, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या : नाना पटोले

editor

Leave a Comment