Civics Mahrashtra

येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई, दिवसेंदिवस पाणीटंचाईची दाहकता वाढतेय

Share

येवला ,२७ मे :

येवल्या तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीबाणी भासू लागली असून अनेक गावे तसेच वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पाणीटंचाईची दाहकता देखील वाढतांना येवला तालुक्यात दिसून येत आहे. जवळपास ५८ गावे व वाड्या वस्त्यांवर ५७ टॅंकरद्वारे सध्या ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.

अक्षरशः उत्तर पूर्व भागामध्ये जनावरांना तसेच माणसांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आहे.टँकर आल्यावर हातातले कामे बाजूला ठेवून मिळेल ते पाणी भरण्यासाठी महिलांची धडपड ग्रामीण भागात दिसून येत आहे. तरी शासनाने टँकर चालू ठेवावे अशी मागणी आता ग्रामस्थ करीत आहे.

Related posts

बाणगंगा तलावाच्या परिसरात नुकसान करणाऱया कंत्राटदाराविरोधात

editor

जोरदार पावसामुळे नद्यांना पुर ; आमदार फुंडकर यांनी दिल्या प्रशासनाला सूचना

editor

अध्यक्ष राजा माने यांची घोषणा,सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी च्या प्रांगणात होणार भव्य महाधिवेशन

editor

Leave a reply

  • Default Comments (0)
  • Facebook Comments