जालना,२७ मे :
२६ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जालना शहरांमध्ये जूना जालना भागातील कैकाडी मोहल्ला या भागात हळदीच्या कार्यक्रमात डिजे लावुन तरूण मंडळी आपला आनंद व्यक्त करत होती
मात्र या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका तरुणाला मयत व्यंकटेश तुकाराम गायकवाड वय २२ वर्ष राहणार कैकाडी मोहल्ला जुना जालना यांचा चुकून धक्का लागला आज धक्का लागला याचा राग मनात धरून त्यांनी मयत व्यंकटेश गायकवाड यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली यावेळी आरोपीचा राग अनावर झाला व त्यांनी तलवार आणून मयत व्यंकटेश तुकाराम गायकवाड यांच्या डोक्यात सपासप वार केला व यामध्ये व्यंकटेश गायकवाड हे जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला
यावेळी नातेवाईकांनी, उपस्थित ग्रामस्थांनी सोडासोड केली असता यामध्ये सोडवण्यासाठी आलेल्या एकाला पुन्हा या संशयित आरोपींनी तलवारीने वार करत जखमी केली आहे यावेळी तात्काळ नागरिकांनी व्यंकटेश तुकाराम गायकवाड यांना एका खाजगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले आहे तर एक जण जो गंभीर जखमी आहे
त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे उपचार सुरू आहेत. मात्र या अचानक झालेल्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे तर या घटनेची माहिती वाऱ्यासारखी जालना शहरासह संपूर्ण कैकाडी मोहल्ला व नातेवाईकांमध्ये पसरल्याने त्यांनी दीपक हॉस्पिटल परिसर व जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये एकच गर्दी केली होती यावेळी बोलताना कैकाडी समाजाचे नेते सुभाष पवार म्हणाले की जोपर्यंत संबंधित आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेहाची अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका पूर्ण कैकाडी समाजाने घेतली आहे, आता या आरोपीला पोलीस केव्हा अटक करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे मात्र कैकाडी समाज बांधवांमध्ये सदर घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.