Uncategorized

सॉल्ट रेस्टॉरंटच्या मालकाविरोधात दोन महिलांचे मालकी शेती वाचविण्यासाठी आमरण उपोषण

Share

मुंबई, ७ जून :

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सॉल्ट रेस्टॉरंट चे मालक विरेन आहुजा या विकासकाच्या मनमानी कारभारा विरोध दोन वृद्ध शेतकरी महिलांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे.

शेतकरी अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांच्या शेतीलगत असलेल्या तळ्याची भिंत या रेस्टॉरंट मालकाने उंच केली आहे असा आरोप उपोषण कर्त्यांनी केला आहे. येथील शेतीलगत आरसीसी बांधकाम करून भिंत उभारल्याने पूर्वापार पाण्याचे नैसर्गिक निचरा होणारे मार्ग बंद झाले आहेत. परिणामी येथील सुपीक जमिनीत हे पाणी चार फुटापर्यंत तुंबत असल्याने दोन वर्षांपासून ही शेतजमीन नापीक झाली आहे.

याविरोधात अनेकदा प्रशासन दरबारी तक्रारी निवेदन देण्यात आले. तहसीलदार यांनी दिलेले आदेशाला आहुजा यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे वृद्ध शेतकरी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत रेस्टॉरंट बाहेर आमरण उपोषण सुरु केले आहे. जिव गेला तरी चालेल आम्हाला न्याय मिळाल्या शिवाय आम्ही येथून हटणार नाही अशी प्रतिक्रिया उपोषणकर्ते अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांनी दिला आहे.

Related posts

मतपेट्या ठेवण्यात आलेल्या शासकीय ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त

editor

करवंद घ्या करवंद च्या आरोळ्या घुमू लागल्या

editor

युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात कचरा फेकून आंदोलन

editor

Leave a Comment