Civics

खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाला दिली भेट

Share

मुंबई,दि।१८ जून :

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी आज बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे अधिकाऱ्यांनी कामात दाखवलेल्या दिरंगाई बाबत त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. यावेळी रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.

रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर देखील त्यांनी यावेळी चर्चा केली आहे. होम प्लॅटफॉर्म पूर्ण झाल्याशिवाय उद्घाटन करण्याच्या फंदात न पडता ते काम लवकर पूर्ण कसे होईल या कडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच कामाच्या बाबतीत दिरंगाई नको, उगाच कारणे देण्यापेक्षा काम करण्यावर भर द्या, मी आज विनंती करतोय पण विनंती करुन पण काही झाले नाही तर, मात्र मी ॲक्शन मोड मध्ये येऊन कारवाई करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान बदलापूर रेल्वे स्टेशनवर स्वच्छता महिला व पुरुष प्रसाधनगृह त्याचबरोबर, होम प्लॅटफ फॉर्मवरून शिल्लक असलेले शेडचं काम, महिलांसाठी स्पेशल रेल्वे त्याचबरोबर, बारा डब्याच्या रेल्वे मध्ये महिलांसाठी वाढीव डबे व रेल्वे फेऱ्या वाढवण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे. यावेळी मध्य रेल्वेचे मुंबईतील अधिकारी वर्ग, रेल्वे प्रवासी संघटना तसेच, इतर रेल्वे प्रवासी व बदलापूर रेल्वे स्थानकातील कर्मचारी यांच्यात ही चर्चा झाली. लोकसभेतील अधिवेशन झाल्यानंतर या संदर्भात ठोस पाऊले उचलणार असून, या सगळ्या कामांच्या बाबतीत मी स्वतः जातीने लक्ष देणार आहे. अधिवेशन आणि इतर प्रशासकीय कामे सोडल्यास, दर पंधरा दिवसांनी मी बदलापूर शहरात भेट देण्यासाठी येणार असल्याचे, यावेळी बाळा मामा यांनी स्पष्ट केले.

मला आश्वासने द्यायला आवडत नाहीत आणि अर्धवट कामांचे श्रेय घेऊन, काम करायला आवडत नाही असे म्हणत, त्यांनी माजी खासदार कपिल पाटील यांना टोला लगावला आहे.

Related posts

बालगृहातील मुली व माजी संस्थाश्रयी महिलांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

editor

वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ : मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ

editor

मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन ठप्प!

editor

Leave a Comment